गोदाम फोडले; १५ लाखांची विदेशी दारू लंपास

By Admin | Updated: June 25, 2014 02:40 IST2014-06-25T02:19:08+5:302014-06-25T02:40:42+5:30

अकोला कुंभारी रोडवरील गोदाम फोडून १४ लाख रुपयांची विदेशी दारू चोरी गेल्याची घटना.

Wrecked warehouse; 15 lakh foreign liquor lamps | गोदाम फोडले; १५ लाखांची विदेशी दारू लंपास

गोदाम फोडले; १५ लाखांची विदेशी दारू लंपास

अकोला: कुंभारी रोडवरील गोदाम फोडून १४ लाख ७४ हजार ८३४ रुपयांची महागडी विदेशी दारू चोरी गेल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. चोरट्यांनी विदेशी दारूचे ४00 खोके लंपास केले असून, या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॅम्प परिसरात राहणारे कमल आलिमचंदानी यांचे कुंभारी रोडवरील कैलाशनगरात अमूल वाईन ट्रेडर्स नामक गोदाम आहे. गोदामात नामांकित कंपन्यांची विदेशी दारूचे खोके ठेवण्यात येतात. गोदामच्या बाजूला सर्व्हिस गल्ली आहे. या ठिकाणी असलेल्या भिंतीला असलेली लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून दारूवर हात साफ केला. गोदाम फोडल्याची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, सिव्हिल लाईन्सचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली.

Web Title: Wrecked warehouse; 15 lakh foreign liquor lamps