शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण सिंचन विहिरींची कामे संथगतीने

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

अकोला जिल्ह्यातील सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच कोटींचा निधी वितरित.

अकोला : जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अडीच कोटींचा निधी गेल्या महिन्यात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला आहे; मात्र सिंचन विहिरी पूर्ण करण्याची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जवाहर विहीर आणि धडक सिंचन योजनेतील सिंचन विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करून, सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला. सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विहिरींच्या अनुदानातही वाढ करण्यात आली. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील १ हजार ११६ सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ५0 लाखांचा निधी गेल्या मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत २८ मार्च रोजी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित करण्यात आला. २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत हा निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला. पंचायत समिती स्तरावरून संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अनुदानातून सिंचन विहिरींची कामे संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांकडून केली जात आहेत. कामांची पाहणी आणि मोजमाप पंचायत समिती स्तरावरील अभियंत्यांमार्फत करण्यात येत आहे. झालेल्या कामाच्या आधारे लाभार्थी शेतकर्‍यांना टप्पानिहाय अनुदान वितरित करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार सिंचन विहिरींची अपूर्ण कामे येत्या ३0 जूनपर्यंत पूर्ण करावयाची आहेत; मात्र अपूर्ण विहिरी पूर्ण करण्याची कामे संथगतीने सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर येत्या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.