शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
3
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
4
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
5
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
6
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
7
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
8
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
9
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
10
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
11
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
12
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
13
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
14
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
15
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
16
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
17
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
18
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
19
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
20
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या संध्याकाळी संघर्ष करणार्‍या महिला कामगारांचा सन्मान * कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचा उपक्रम

By admin | Updated: May 3, 2014 19:08 IST

कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणार्‍या १५ कामगार महिलांचा कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

अकोला : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणार्‍या १५ कामगार महिलांचा कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
राज्यात कामगार दिन उत्साहात साजरा होतो. १ मे रोजी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे अकोल्यात वयोवृद्ध निराधार कामगार महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आयुष्याच्या संध्याकाळी धुणीभांडी, इतरांच्या घरी स्वयंपाक, मजुरी करणार्‍या महिलांचा नऊवारी पातळ, चोळी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये रुखमाबाई चंदनगोळे, कुसुमबाई सकळे, शशिकला ढोके, मैनाबाई पाटील, कलावती वाच, शांताबाई खंडारे, अनुसया देशमुख, शकुंतला बेडेकर, सरला यादव, दुर्गाबाई राईकर, सुमित्रा राठोड, कामिनीबाई मोरखडे, कुसुम सोनोने, उज्ज्वला इंगळे या महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, सचिव के.एस. घोरपडे, डॉ. शांताराम बुटे, शांताबाई आळशी, प्रभाताई पांडे, हभप सुजित महाराज देशमुख, डॉ. नानासाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मेघा कनकेकर, प्रा. चेतना आनंदाणी, अपर्णा काळे, राजेश्वर पेठकर, संजय ठाकरे, अनिल उगवेकर, आशा उगवेकर, जयंत जोशी, दीपक वाघमारे, प्रशांत पाटील, संजय बुटोले, अतुल कुळकर्णी, दमोदर नुपे यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स...
उतार वयात संसाराचा गाडा ओढणारी गयाबाई
किरकोळ भाजीपाला विक्रेता असलेल्या पतीचे निधन झाले... तरुण मुलालाही मृत्यूने कवटाळले.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही गयाबाई हिरुळकर या महिलेने जीवनाशी संघर्ष सुरू ठेवला. आयुष्याच्या संध्याकाळी ही महिला सून व नातवंडांचा सांभाळ करीत आहे. गयाबाई उतारवयात धुणीभांडीसारखी मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढत आहे. कामगार दिनानिमित्त कस्तुरी चॅरिटेबल सोयसायटीतर्फे गयाबाईचाही सत्कार करण्यात आला.
फोटो: सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर व कष्टकरी महिला.