शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-दिग्रस राज्य मार्गाचे काम अर्धवट

By admin | Updated: June 8, 2014 00:10 IST

अकोला ते बार्शीटाकळीदरम्यानच्या १७ किलोमीटरपैकी केवळ तीन किलोमीटर अंतर उरले असताना हे काम रखडले आहे.

लोहगड : गत पाच वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झालेल्या अकोला ते दिग्रस या राज्य मार्गाचे काम गत काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यानच्या १७ किलोमीटरपैकी केवळ तीन किलोमीटर अंतर उरले असताना हे काम रखडले आहे.
अकोला-दिग्रस राज्य मार्ग क्रमांक ६ ची अवस्था ५ ते ६ वर्षांपासून अतिशय दयनीय झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यान असलेल्या १७ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम केवळ ३ किलोमीटर अंतर उरले असताना बंद करण्यात आले. हे काम अद्यापही अर्धवटच असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले बार्शीटाकळी शहर जिल्हा मुख्यालयापासून सर्वात जवळ असल्यामुळे या मार्गावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून ट्रक, ट्रॅक्टर, मिनी बस, एस.टी. बस, लक्झरी बस, जीप आणि दुचाकींसह विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. बार्शीटाकळी ते अकोला हे अंतर केवळ १७ किलोमीटरच आहे. त्यातील ३ किलोमीटर अंतराचे काम रखडून ठेवण्यामागचा उद्देश किंवा कारण काय, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. सदर मार्गावरील आळंदा फाटादरम्यान २ किलोमीटरचे व कान्हेरी सरपजवळ १ कि लोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्यात आले नाही. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुक वून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दोन वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे हे खड्डे बुजवून मार्गाची चांगली दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला असताना पाऊस पडण्यापूर्वी हे काम करणे आवश्यक आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम निकृष्ट होऊन पुन्हा मार्गाची अवस्था जैसे थे होईल, म्हणून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून क रण्यात येत आहे. (वार्ताहर)