स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूलमध्ये महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:20 AM2021-03-10T04:20:17+5:302021-03-10T04:20:17+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महिलांचा सत्कार अकोट: राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात गायत्री रमेश थारकर, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा ...

Women's Day at the local Freedom English High School | स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूलमध्ये महिला दिन

स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूलमध्ये महिला दिन

Next

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महिलांचा सत्कार

अकोट: राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात गायत्री रमेश थारकर, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष राम म्हैसने, रमेश खलोकार श्रीकृष्ण रोठे, शारदा थोटे, माया दहीभात, नानासाहेब देशमुख, कैलास थोटे, हरिदास दहिभात, समसुद्दिन बुवा, कैलास खडसान यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामीण रूग्णालयात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

अकोट: ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिलादिनी जेष्ठ महिला व रुग्णालयात कार्यरत महिलांना कोरोनाची लस देण्यात आली. महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक मंगेश दातीर, डॉ सदाफळे, डॉ राजपूत, डॉ गुल्हाणे, कोरोना विभागाचे डॉ रुपाली गुजर, डॉ कापसे यांच्यासह रुग्णालयात कार्यरत नर्स,कर्मचारी-अधिकारी यांची उपस्थिती होती.

कालवाडी ग्रामपंचायतमध्ये महिला दिन

अकोट: कालवाडी ग्राम पंचायतमधील महिला सदस्य, बचत गट महिला यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पं.स. सभापती लताताई नितोने, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी गठेकर, विस्तार अधिकारी पद्मने, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच प्रज्ञा दिनेश सरकटे‌‌, सचिव राऊत, अभियंता प्रतिक नांदूरकर, अवधुत रावणकार उपस्थित होते.

Web Title: Women's Day at the local Freedom English High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.