शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर, खापरखेड येथील महिलांची पाण्यासाठी पंचायत समितीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST

पातूर : तालुक्यातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांची पाण्यासाठी ...

पातूर : तालुक्यातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी सोमवारी (दि.१२) पंचायत समिती कार्यालयात धडक घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला घेराव घातला.

तालुक्यातील ग्रामपंचायत शेकापूर अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा हे अकोला जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांचे गाव आहे. त्यांच्याच गावातील महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी जावे लागत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. रामनगर, खापरखेडा येथे महिलांना दूरवरून विहिरीतून पाणी आणण्याची वेळ आल्याने मोलमजुरी सोडून महिलांना घरी राहावे लागत आहे. तसेच गुरांच्या पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. पंचायत समितीमध्ये मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती दाभाडे यांच्या नेतृत्वात महिलांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दिनेश मांगुळकर यांना घेराव घालून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी करीत निवेदन दिले. निवेदनावर पुष्पा पुरुषोत्तम शिरसाट, सुनीता गणेश राठोड, इंदूबाई बाळू पवार, उषाबाई संजय राठोड, अलकाबाई सदाशिव राठोड, किरण मंगेश राठोड, केसरबाई संतोष चव्हाण, माया राठोड, वर्षा अंकुश चव्हाण, रेखा कनीराम चव्‍हाण, अमिता राम राठोड, मंजुळाबाई दिलीप चव्हाण, मोनिका अनिल राठोड, कविता कैलास पवार आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जांभरून येथेही तीव्र पाणीटंचाई

बाभूळगाव ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जांभरून येथेही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी पातूर पंचायत समितीत धाव घेऊन निवेदन दिले आहे. पातूर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी पदाचा प्रभार विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांच्याकडे आहे. ते सुटीवर असल्यामुळे अकोटचे गटविकास अधिकारी ओ.टी. गाठेकर यांच्याकडे प्रभार दोन दिवसांपूर्वी देण्यात आला. त्यांना अकोट सांभाळून पातूरला येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पातूर पंचायत समितीतील कामे थंडावली आहेत.

--------------------------------------------

शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत पाणीटंचाई निर्माण झाली आहे; मात्र काही जण राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. लवकरच उपाययोजना करून गावातील पाणीटंचाई दूर करण्यात येईल.

-सावित्रीबाई हिरासिंग राठोड, जि.प. उपाध्यक्ष, अकोला