पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:22 IST2025-05-02T16:20:40+5:302025-05-02T16:22:58+5:30
किशोर किसन ससाणे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे.

पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पत्नी माहेरी गेल्याने मानसिक तणावात असलेल्या इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ एप्रिलच्या रात्री महान ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिहाड माथा येथे घडली. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किशोर किसन ससाणे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे.
पती पत्नीमध्ये काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. त्यामुळे त्याची पत्नी गेल्या सहा-सात दिवसांपासून माहेरी गेली होती.
पत्नीच्या वियोगामुळे किशोर तणावाखाली होता आणि तो दररोज मद्यप्राशन करत असल्याचे सांगण्यात येते. रागाच्या भरात किशोर ससाणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.