पत्नी नांदायला आली नाही, जावयाने केली सासऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 08:25 PM2020-12-06T20:25:07+5:302020-12-06T20:25:43+5:30

पत्नी नादांयला परतली नसल्याचा रागातून त्यांनी सासरे श्रीराम सपकाळ यांची हत्याच केल्याचे समाेर आले आहे.

Wife did not come to home, Son in Law killed his father-in-law | पत्नी नांदायला आली नाही, जावयाने केली सासऱ्याची हत्या

पत्नी नांदायला आली नाही, जावयाने केली सासऱ्याची हत्या

Next

अकाेला : चांदुर येथील रहीवासी श्रीराम बाबुराव सपकाळ यांची हत्या त्यांच्या मानलेल्या जावयानेच केल्याचे समाेर आले आहे. मनाेज इंगळे असे आराेपीचे नाव असून त्याची पत्नी नादांयला परतली नसल्याचा रागातून त्यांनी सासरे श्रीराम सपकाळ यांची हत्याच केल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणात खदान पाेलीस मनाेजच्या मागावर आहेत.

श्रीराम सपकाळ यांची कापशी येथे दुसरी पत्नी असून त्यांच्या भारती नामक मुलीचे लाॅकडाउनच्या काळात मनाेज इंगळे रा. जेतवन नगर याच्याशी लग्ण लावून दिले हाेते. त्यानंतर भारती काही दिवस मनाेजसाेबत राहीली मात्र परत माहेरी गेल्यानंतर मनाेजकडे आलीच नाही. त्यामुळे मनाेज इंगळे याने त्याचे सासरे श्रीराम सपकाळ यांना पत्नीला परत पाठविण्याची मागणी केली. मात्र पत्नी परत येत नसल्याने तसेच मनाेजच्या घरातील पैसेही घेउन गेल्याने संतापलनेल्या मनाेज इंगळे याने शनिवारी सायंकाळी त्याचे सासरे श्रीराम सपकाळ यांची निमवाडी परिसरात धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. या घटनेनंतर पाेलीसांनी मनाेज इंगळे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरु केला आहे. पाेलीसांनी त्याचे लाेकेशन घेतले असून त्याला अटक करण्यात येणार आहे.

 

मनाेज इंगळे याची पत्नी घरातील पैसे घेउन परत गेल्यानंतर ती परत येत नसल्याने त्याने रागाच्या भरात श्रीराम सपकाळ यांची हत्या केली. पाेलीसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरु केला आहे. आराेपीच्या मागावर पाेलीस असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.

- डी. सी. खंडेराव, ठाणेदार खदान पाेलीस स्टेशन

Web Title: Wife did not come to home, Son in Law killed his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.