शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धाकट्या जावेने थोरलीला जाळले

By admin | Updated: August 4, 2014 01:14 IST

एका विवाहित महिलेची नात्याने धाकटी जाऊ लागत असलेल्या महिलेने जाळून हत्या

बाळापूर: पैसे उसणवारीच्या क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेची नात्याने धाकटी जाऊ लागत असलेल्या महिलेने जाळून हत्या केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी रविवारी आरोपी महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी जळालेल्या महिलेच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पोलिसांनी ३0७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु २ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी रविवार ३ ऑगस्ट रोजी त्याचे रुपांतर खुनाच्या गुन्हय़ात केले. पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील गीता दादाराव मुंडे (४५) व तीची चुलत धाकटी जाऊ सुनीता देवानंद मुंडे यांच्यात २६ जून रोजी उसणवारीच्या पैशांवरून वाद झाला. या वादावादीतून संतप्त होऊन सुनीता मुंडे हिने गिता हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यामुळे ती ७0 जळाली. तिला उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतत्प झालेल्या गीताच्या नातेवाईकांनी २६ जुनपासून फरार असलेली सुनीता मुंडे व तिचा पती देवानंद मुंडे यांना अटक करण्याची मागणी करीत रविवारी दुपारी मृतदेह बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये आणला. दोषींना अटक करेपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका त्यांनी लावून धरली असता, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी गीताचा मृतदेह तेथून हलविला व तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मनिषा राऊत करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)