शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भाला मिळाले ४७ कोटी!

By admin | Updated: July 17, 2015 01:49 IST

दुष्काळग्रस्त शेतक-यांनां मिळणार मदत.

अकोला : गतवर्षी दुष्काळी मदत म्हणून जाहीर केलेली रक्कम ज्या शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींमुळे मिळू शकली नव्हती, त्यांना ती लवकरच मिळणार आहे. बँक खाते नसल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे ४७ कोटी रूपये शासनाकडे परत पाठविण्यात आले होते. ते शेतकर्‍यांना देण्याची प्रक्रीया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली होती. त्यातील ८0 टक्केच्यावर रक्कम पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मिळाली होती; तथापि शेतकर्‍यांचे पात्र बँक खाते उपलब्ध झाले नसल्याने मार्च २0१५ मध्ये ४७ कोटी रूपये शासनाकडे परत पाठविण्यात आले होते. शासनाने ही रक्कम पाठविली असून, लवकरच ती शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जी रक्क म मिळाली त्यामध्ये अमरावती जिल्हय़ाला ८.५0 कोटी रुपये, अकोला जिल्हय़ाला ८.६0 कोटी रुपये, वाशिम जिल्हय़ाला ६.४६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ातील परत गेलेली ही रक्कम शेतकर्‍यांना प्राप्त झाली आहे. मागील खरीप हंगामात दुष्काळस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना शासनाने मदत जाहीर केली होती. वाशिम जिल्हय़ाला या अगोदर १११ कोटी मिळाले आहेत. उर्वरित ६ कोटी ४६ लाख रूपये ११ जुलैला मिळाले आहेत. ते शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील, असे वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले.