शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
3
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
4
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
5
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
6
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
7
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
8
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
9
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
10
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
11
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
12
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
13
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
14
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
15
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
16
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
17
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
18
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
19
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
20
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
Daily Top 2Weekly Top 5

समिती ठेवेल मास्तरांवर ‘वॉच’

By admin | Updated: May 7, 2014 15:10 IST

शैक्षणिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता शिक्षण विभागात त्रिस्तरीय समिती

वाशिम : शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या शैक्षणिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता शिक्षण विभागात त्रिस्तरीय समिती गठित करण्यात येणार आहे. शाळेतील ज्ञानदानाकडे कानाडोळा करून खासगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकांपासून तर शिक्षण क्षेत्रातील नाना गैरसोयीवर या समितीचा वॉच राहणार आहे. तक्रारकर्त्या नागरिकांची डोकेदुखी दुर व्हावी यासाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असुन समिती आॅनलाईन तक्रारीची दखलही घेणार आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला या समित्यांमुळे गती येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. मोफत व सक्तिचे शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व बालकांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र, काही महत्वाकांक्षी संस्थाचालक व पैसा कमाविण्याच्या हव्यासाने झपाटलेल्या शिक्षकांमुळे काही ठिकाणी या कायद्याची पायमल्ली होत आहे. याबाबत नागरिकांनी संबधितांची तक्रार करूनही केवळ कायद्यात तरतूद नसल्यामुळे नियम धाब्यावर बसविणार्‍यांवर कारवाई होत नव्हती. नेमकी हीच बाब हेरून मोफत व सक्तिचे शिक्षण हक्क कायद्याच्या कलम ३२(१) नुसार पालक व नागरिकांच्या तक्रारीचा जलद निपटारा होण्यासाठी त्रिस्तरिय तक्रार निवारण समिती गठित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घैतला आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर अशा तिकोणात या समित्या कार्यरत राहणार आहेत. सदर तक्रार निवारण समितीमुळे शिक्षणातील बाजारीकरण दुर सारण्याला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. शाळेतील ज्ञानदानाकडे कानाडोळा करून केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी खासगी शिकवणी वर्गाचा आधार घेणार्‍या पैसालोलुप शिक्षकांनाही या समितीच्या माध्यमातून तालावर आणता येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडुन अतिरिक्त शुल्क वसुल करणे, त्यांचा मानसिक व शारिरिक छळ करणे आदी बाबींनाही या त्रिस्तरिय समितीच्या माध्यमातून आळा बसणार असल्याचे शिक्षण क्षैत्रातील जाणकारांचे मत आहे.