शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

निवडणुकीपूर्वी युद्ध किंवा आणीबाणी निश्चितच! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 2:07 PM

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.

ठळक मुद्दे सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.शनिवारी सायंकाळी समाजमाध्यमामध्ये त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाईल, त्यामध्ये नफ्या-तोट्याचे गणित मांडून शेजारच्या राष्ट्राशी युद्ध केले जाऊ शकते. ते न जमल्यास देशांतर्गत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून, समर्थक आणि विरोधकांच्या दंगली घडवल्या जातील, त्यातून आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी असल्याचे ठरवण्यात आले. त्याचवेळी देशातील संघविरोधक, आंबेडकरवादी काहीच बोलायला तयार नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. तो समजून घेतला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. काँग्रेस, भाजपशिवाय तिसरा पर्याय उभा केला, तर लोकांचा सहभाग मिळत नाही. लोकांनी तिसरा पर्याय स्वीकारल्यास या दोघांनाही वठणीवर आणणे कठीण नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसची एवढी वाताहत होत असतानाही प्रादेशिक पक्षांना गृहित धरण्याचे धोरण सुरूच आहे. प्रादेशिक पक्ष सातत्याने काँग्रेसला प्रस्ताव देतात, चर्चेची मागणी करतात. काँग्रेस काहीच बोलायला तयार नसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. आधारभूत किमतीचे पुन्हा गाजरशेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत प्रधानमंत्री मोदींनी घोषणा केली. ती करताना अंमलबजावणी कशी होईल, हे सांगितले नाही. केंद्र शासनाने खरेदी यंत्रणा असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या सर्व गोदामांची विक्री केली आहे, आता कोणत्या यंत्रणेमार्फत खरेदी केली जाईल, हे न सांगितल्याने आधारभूत किमतीचे गाजर दाखवल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ