शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील छोटे बंधारे वा-यावर!

By admin | Updated: February 23, 2015 01:56 IST

१७४ लघू प्रकल्प, कोल्हापुरी बंधा-यांचा आकडा मोठा पण नियोजन काय?

राजरत्न सिरसाट / अकोला: पश्‍चिम विदर्भात १७४ लघू प्रकल्प असून, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव आणि वळण बंधार्‍यांची यादी मोठी आहे. प्रत्यक्षात यातील किती प्रकल्प, बंधार्‍यातून शेतकर्‍यांना सिंचन सुविधा पुरविली जाते, हा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे. मुलस्थानी जलसंधारण व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्हय़ात १0१ ते २५0 हेक्टर सिंचन क्षमतेचे एकूण १७४ लघू प्रकल्प आहेत. यातील ३0 प्रकल्प अकोला जिल्हय़ात असून, वाशिम जिल्हा ७, बुलडाणा ७४ आणि यवतमाळ जिल्हय़ात ६२ लघू प्रकल्प आहेत. या व्यतिरिक्त पाझर तलाव, कोल्हापुरी आणि वळण बंधार्‍यांचा आकडा मोठा आहे. अकोला जिल्हय़ातील या सर्व बंधार्‍यांची आकडेवारी जवळपास ४१३ च्यावर आहे. यात शून्य ते १00 हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले ७२ पाझर तलाव असून, या तलावांच्या पाण्यावर एकूण २,७८३ हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. लघू प्रकल्पाची सिंचन क्षमता २,९३४ एवढी आहे. शून्य ते १00 हेक्टर क्षमतेचे २४ छोटे बंधारे आहेत. शून्य ते २५0 हेक्टर क्षमतेचे ६२ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधार्‍यांची सिंचनक्षमता एकूण ३,४७७ हेक्टर आहे. शून्य ते १00 हेक्टरपर्यंतचे २४ बंधारे असून, त्यातून १,६९८ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलित होणे अपेक्षित आहे. तसेच शून्य ते १00 हेक्टरपर्यंतचे २१४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पामधून ७७.९६ हेक्टर क्षेत्राला पाण्याची सोय होणे अपेक्षित आहे. तर ११ वळण बंधारे आहेत. यामधून ४६८ हेक्टर असे सर्व प्रकल्प, बंधारे मिळून अकोला जिल्हय़ात १९,१५६ हेक्टर सिंचन व्हायला हवे, पण आजमितीस या प्रकल्पामधून किती सिंचन केले जाते, हाच संशोधनाचा विषय मानला जात आहे. गेल्यावर्षी पुरक पाऊस नसल्याने काही प्रकल्पामध्ये जलसंचय झाला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्येक वर्षाचे नियोजन काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.