शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : राजराजेश्वर मंदिरात उसळला जनसागर

By admin | Updated: February 24, 2017 16:12 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. २४ -  अकोला शहराचे  आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव आयोजित ...

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ -  अकोला शहराचे  आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला.
अकोल्यातील राजराजेश्वाराचे मंदिर हे अत्यंत पुरातन असून, ६00 ते ७00 वर्षांपूवीपासून असलेले सांगितल्या जाते. शिवपिंडसुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे.  भक्तांवर दया करणारा आणि अडचणीच्या क्षणी त्यांच्या हाकेला धावून जाणाºया राजराजेश्वरावर अकोलेकारांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी राजराजेश्वराला पूर्णेच्या पाण्याचा अभिषेक करण्यासाठी निघणारी पालखी व कावड यात्रेची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. महाशिवरात्रीचा उत्सवसुद्धा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली. दुपारी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. परिसरात विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने  लावल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)
 
मंदिराबाबत दंतकथा प्रसिद्ध
राजेश्वर मंदिराबाब एक दंतकथा प्रसिद्ध आहे. पूर्वी मोर्णा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या असदगड किल्ल्यात अकोलसिंह नावाचा राजा राहत होता. त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्त होती. ती दररोज  सूर्योदयापूर्वी अंधारातच किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असे. दररोज सकाळी न सांगता ती बाहेर जात असल्यामुळे राजाला संशय आला आणि एके दिवशी रागाने तो पाठलाग करू लागला. त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे बघून तो संतापला आणि तिला मारण्यासाठी मागे धावला. राणी घाबरून राजेश्वराच्या धावा करू लागली. तेव्हा तिची प्रार्थना ऐकून तिला वाचवण्यासाठी महादेवाची पिंड दोन भागात विभाजित झाली व राणीला आपल्यात सामावून घेतले. तेव्हापासून येथे राजराजेश्वराचे मंदिर असल्याचे भाविक सांगतात.

https://www.dailymotion.com/video/x844sgl