शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतक-यांच्या प्रक्रिया उद्योगास चालना!

By admin | Updated: November 19, 2014 02:31 IST

सीताफळाचा गर काढून बिया वेगळे करणारे यंत्र विकसित.

राजरत्न सिरसाट / अकोला

         विदर्भातील कृषिप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच मालिकेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने सीताफळाचा गर काढून बिया वेगळे करणारे अल्प किमतीचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विदर्भातील शेतकरी, उद्योजकांना देण्यात येत आहे. दरम्यान, कापणीपश्‍चात तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाने आतापर्यंत चार प्रक्रिया उद्योग उभे केले आहेत. डाळिंब या पिकासह प्रचंड मागणी असलेल्या सीताफळाचे क्षेत्र राज्यात ५६ हजार हेक्टरने वाढले आहे. कोरडवाहू क्षेत्रात उत्तम, शाश्‍वत आर्थिक स्रोत बनू शकणार्‍या या फळपिकाचे क्षेत्र आणखी वाढतच असून, या फळांवर प्रक्रिया करू न डबाबंद गर विक्रीसाठी तयार केला जात आहे. सीताफळाच्या या गराला भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठाने गराची काढणी सुलभ करणारे अवघ्या साठ हजार रूपये किमतीचे यंत्र विकसित केले आहे. तद्वतच सीताफळाच्या नवीन जातीचे संशोधन करण्यावरही कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. सीताफळाचे आयुष्यमान दोन दिवसांचे असते. या फळाचा गर काही तासांत खराब होत असल्याने या यंत्राचे महत्त्व वाढले आहे. या अगोदर हे यंत्र तयार करण्याचे बरेच प्रयत्न झालेत. तथापि, त्या यंत्राची किंमत शेतकरी, उद्योजकांना परवडणारी नव्हती. शिवाय यंत्रामधून गर काढण्यासाठी विलंब होत असल्याने, त्याऐवजी मजूर लावूनच सीताफळाचा गर काढण्याचे काम आजमितीस केले जात आहे. आता कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्राने शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. या यंत्राची किंमत साठ हजार रूपये असून, एका तासात ५0 ते ६0 किलो चांगल्या प्रतीचा गर काढण्याची क्षमता आहे. या यंत्राची पाहणी करण्यासाठी राज्यातील शेतकरी, बडे उद्योजक येथे येत आहेत. शेतकर्‍यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, याकरिता या कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.