चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:43 PM2020-03-11T13:43:09+5:302020-03-11T13:47:16+5:30

या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

Unique Holiotsav celebrated in the cemetery of Akola | चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

Next

अकोला : भूत माणसाच्या डोक्यात असून स्मशानात उरतात फक्त कर्मकांडे हा संदेश देत उमरी येथील स्मशानभूमीत अकोल्यातील कवींची बहारदार मैफल रंगली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या वर्षी पासून सुरू केलेल्या स्मशान होलीकोत्सव या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.
अमावस्या आणि पौर्णिमेला स्मशानात भुतेजागृत होतात हा गैरसमज दूर करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महानगर शाखेच्यावतीने ‘स्मशान होलीकोत्सव ’आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे सल्लागार शरद वानखडे,जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे,डॉ.स्वप्ना लांडे, संध्याताई देशमुख , माणिकरवजी नालट यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंनिसचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले यांनी प्रास्ताविक करून जगात भूत नसल्याचे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व भूतप्रेताची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी हे आयोजन असल्याची माहिती दिली. यावेळी रंगलेल्या कविसंमेलनात संतोष कोकाटे, प्रा.हरिदास आखरे, गोपाल मापारी,अमोल गोंडचवर, प्रकाश भोंडे,मनोज लेखणार,गजानन छबिले,धीरज चावरे,स्वप्नील कोकाटे, राजाभाऊ देशमुख, सुनील लव्हाळे या कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून प्रबोधन केले.
कवी संमेलन झाल्यानंतर स्मशानात होळी पेटवून व रंग खेळून स्मशानभूमी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी स्मशानात काही खाऊ नये या मान्यतेला छेद देण्यासाठी सर्वांनी मिळून अल्पोपहार घेतला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संध्या देशमुख, अनिल लव्हाळे, शेषराव गव्हाळे, मंगेश वानखडे,दिगंबर सांगळे, धम्मदीप इंगळे,भारत इंगोले,कौशिक पाठक, श्यामराव देशमुख, नरेंद्र चिमनकर, अ‍ॅड. रवी शर्मा, विजय बुरकले, विठ्ठल तायडे, आशु उगवेकर, विकास म्हस्के , मीनल इंगोले, रिया उगवेकर, राजेश गावंडे, संदीप देशमुख, नंदिनी सांगळे, आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Unique Holiotsav celebrated in the cemetery of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.