'पीडिकेव्ही' राजापूर  शेतशिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 15:35 IST2018-05-11T15:35:45+5:302018-05-11T15:35:45+5:30

बोरगाव मंजू : राष्ट्रिय महामार्गवर   डाॅ.  पंजाबराव देशमुख  कृषी  विद्यापीठ    राजापूर  शेतशिवारात  एका अनोळखी  45  वर्षांय इसमाचा  कुंजलेल्या स्थितीत  मृतदेह गुरुवारी  आढळून आल्याने परिसरात  खळबळ  उडाली.

Unidentified dead body found in Rajapur village |   'पीडिकेव्ही' राजापूर  शेतशिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला 

  'पीडिकेव्ही' राजापूर  शेतशिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला 

ठळक मुद्देमहामार्गापासुन हाकेच्या अंतरावर गुरुवारी  सकाळी मजुर गेले असता  त्यांना मृतदेह आढळून  आला.  पि. एस आय  युवराज  उईके,  हे  का  गणेश  निमकंडे,  प्रविण वाकोडे  सह  घटनास्थळी  पोहचून  सदर  धटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून  पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बोरगाव मंजू : राष्ट्रिय महामार्गवर   डाॅ.  पंजाबराव देशमुख  कृषी  विद्यापीठ    राजापूर  शेतशिवारात  एका अनोळखी  45  वर्षांय इसमाचा  कुंजलेल्या स्थितीत  मृतदेह गुरुवारी  आढळून आल्याने परिसरात  खळबळ  उडाली.  पोलिसांनी  घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय  तपासनी  करीता  पाठविण्यात  आला . 

प्राप्त माहितीनुसार  डाॅ.  पंजाबराव देशमुख  कृषी  विद्यापीठ  राजापूर  शेतशिवारात   महामार्गापासुन हाकेच्या अंतरावर गुरुवारी  सकाळी मजुर गेले असता  त्यांना मृतदेह आढळून  आला.  दरम्यान सदर  घटनेची  माहीती  पोलिसांना  दिली दरम्यान  घटनास्थळवर  पि. एस आय  युवराज  उईके,  हे  का  गणेश  निमकंडे,  प्रविण वाकोडे  सह  घटनास्थळी  पोहचून  सदर  धटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता सदर मृतदेह  कुंजलेल्या  स्थितीत   असुन  विवस्त्र आहे.  बाजुला  अंगावरील  जिन्स  पॅन्ड ,  काळ्या रंगाचे टि शर्ट,  विटकरी  रंगाचा कंबर  पट्टा,  हेड फोन  मृतदेहाचा  बाजूला  आढळून आले. तर सदर  मृतदेह  कुंजलेल्या  स्थितीत   असुन  अंदाजे दोन  ते तीन दिवसा पासुन  मृतदेह  पडलेला  असावा, असा पोलीसाचा अंदाज आहे. तर  सदर   अनोळखी इसमाची ओळख  पटेल  असे काहीच मिळुन आले नाही पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून  पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Unidentified dead body found in Rajapur village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.