शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू अभियानातंर्गत राज्यात जलसंचय व्यवस्थापनावर भर !

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

अकोला जिल्हयातील पाच गावांची निवड.

अकोला : कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. सुरू वातीला राज्यातील ४0३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटीचे नियोजन करण्यात आले आहे;अकोला जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे पाच गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील पिकाखालील क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेत होत असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला अद्यापही स्थैर्य प्राप्त होऊ शकले नाही. या क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन व कृषीपूरक उपक्रमांसाठी सहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात सातत्य टिकवता येईल व त्यामुळे स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. या उद्देशाने राज्य शासनाने मागीलवर्षापासून राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मणुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या योजनेला अधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररित्या उपलब्ध करू न देण्यात आली आहे.या अभियानातंर्गत अकोला जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील एक या प्रमाणे पाच गावांची निवड करण्यात आली असून, या गावामध्येजलसंचय व्यवस्थापन कार्यक्रमासह एकात्मिक शेती पध्दती,मुल्यवर्धीत शेती विकास, सेंद्रीय शेती कायक्रम, काढणी पश्‍चात साठवूणक, प्रक्रिया आणि शेतकर्‍यांना प्रशिक्षण आदी विकासात्मक बाबीवर भर दिला जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्रात पाणी हा महत्वाचा घटक असल्याने पावसाच्या पाण्याची साठवण, नियोजन आणि वापर अर्थात मुलस्थानी जलसंवर्धन या विषयावर अधिक भर दिला जाणार आहे. अकोला जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील एक या प्रमाणे पाच गावांची निवड करण्यात आली असून, या गावात कोरडवाहू शेती सुधारणे साठी या अभियानातंर्गत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक प्रमोद लहाळे यांनी स्पष्ट केले.