शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डिंग्ज; कंपन्यांच्या विरोधात तक्रार

By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST

अकोला मनपा अधिका-यांची सिटी कोतवालीत धाव.

अकोला: शहरात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासन अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या कंपन्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी सरसावले. शनिवारी रात्री उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध २१ कंपन्यांविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे.अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहर विद्रूप होण्यासोबतच मनपाचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता, १६ डिसेंबरपर्यंत अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई पूर्ण करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मनपाला दिले. तसेच ज्या होर्डिंग्जवर राजकीय नेता, पदाधिकार्‍यांचे फोटो आहेत, अशा राजकीय पदाधिकारी वा कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्याचे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. अकोला मनपाने मात्र अद्यापपर्यंत एकही फौजदारी तक्रार नोंदवली नसल्याने शहरात अवैध होर्डिंंग्जचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत, मनपा प्रशासनाने रामदासपेठ पोलीस ठाणे व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या २१ होर्डिंग्जचे छायाचित्र गोळा केले. मनपाकडून रीतसर परवाना घेतला नाही, अशा कंपन्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी जी.एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री धाव घेतली.