शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बसस्थानकांना अषोघित दुचाकी 'पार्किंग'चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 1:09 PM

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील दोन्ही आगारात दररोज अघोषित दुचाकी पार्किंगचा विळखा टाकला जात आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील दोन्ही आगारात दररोज अघोषित दुचाकी पार्किंगचा विळखा टाकला जात आहे. या प्रकारामुळे बसस्थानकातील फलाटावर येणाºया एसटी चालक-वाहकांना त्रास सहन करावा लागत असला तरी वरिष्ठ अधिकारी आणि डेपो व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष आहे.अकोला शहरातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांची आगार क्रमांक एकवर आणि अकोल्यातून संपूर्ण राज्यात प्रवास करणाºयांची आगार क्रमांक दोनवर कायम गर्दी असते. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करीत असतात. त्यामुळे दोन्ही बसस्थानकांवर गर्दी असते. कुणी आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी तर स्वत: आपले दुचाकी वाहन घेऊन बसस्थानकावर येत असतात. त्यामुळे पार्किंग झोनसोबतच परिसराला अघोषित पार्किंगचे रूप आलेले असते. अनेकजण बसस्थानकाच्या आतील भागातदेखील गाड्या ठेवण्याची हिंमत करतात. बस उभी राहत असलेल्या फलाटावर गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने एसटी चालक-वाहक त्रासले आहेत. एसटी चालक-वाहकांना बसगाड्या उभ्या करण्यासाठी दुचाकी वाहने काढावी लागतात. या प्रकाराकडे म.रा. परिवहन अकोला विभागातील अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. अघोषित दुचाकी पार्किंगचा दोन्ही बसस्थानकांवरील विळखा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टोइंग पथकाचा अतिरेकदोन्ही आगारातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. या हजारो लोकांसोबतच दररोज येथे हजारो वाहनेदेखील ये-जा करीत असतात. ही वाहने परिसरात ठेवताच टोइंग पथक येथून वाहने उचलून नेतात. त्यामुळे अनेकांना भुर्दंड सोसावा लागतो. टोइंग पथकाच्या या अतिरेकी कारवाईमुळे अनेकजण आपले वाहन थेट फलाटावर ठेवतात. वास्तविक पाहता, टोइंग पथकाने बसस्थानक परिसरात येऊच नये; मात्र शिस्तीपेक्षा वसुलीवर वाहतूक शाखेचा भर असल्याने आणि वाहनाच्या रूपात सहज सावज मिळत असल्याने टोइंग पथकाची गस्त येथे असते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Bus Standअकोला बस स्थानकstate transportएसटी