दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; एकजण ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:17+5:302021-03-07T04:17:17+5:30

महेश सुभाष वानखडे (३२) रा. धानोरा वैद्य असे मृताचे नाव आहे. सखूबाई नामदेवराव सोनोने (७०) असे गंभीर जखमी झालेल्या ...

Two-wheeler hit by unknown vehicle; One killed, one serious | दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; एकजण ठार, एक गंभीर

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; एकजण ठार, एक गंभीर

Next

महेश सुभाष वानखडे (३२) रा. धानोरा वैद्य असे मृताचे नाव आहे. सखूबाई नामदेवराव सोनोने (७०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. धानोरा वैद्य येथील रहिवासी सखूबाई नामदेवराव सोनोने व महेश सुभाष वानखेडे हे दोघेही काही कामानिमित्त एमएच ३०आर ५६७३ या क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापूर येथे जात असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास लाखपुरी नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महेश सुभाष वानखेडे (३२) हे जागीच ठार झाले तर सखूबाई नामदेवराव सोनोने( ७०) या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाची टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमी व मृतास येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler hit by unknown vehicle; One killed, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.