शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे दोन पोलिस गजाआड

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

आरोपीकडून २0 हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण.

अकोला: रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याच्या एटीएममधून २0 हजार काढून समाधान न झालेल्या दोन पोलिस हेड कॉन्स्टेबलांनी आणखी १0 हजारांची मागणी केली. या लाचखोर दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. सोनसाखळी चोरीचा आरोप असलेला मलकापूर येथील महेश करोडदे यास जीआरपी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. महेश रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असताना एएसआय शेख अन्वर शेख अली आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई, इरफान अजीज खान पठाण यांनी त्याच्याकडील एटीएम कार्ड काढून घेतले आणि त्याला कोठडीत मारहाण न करणे, वृत्तपत्रांना माहिती न देणे आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याला सुरुवातीला २0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. करोडदे याने मागणी मान्य करताच या लाचखोरांनी त्याच्या एटीएमचा कोड नंबर माहिती करून घेत त्याच्या एटीएममधून २0 हजार रुपयांची रोख काढली. त्यानंतरही लाचखोरांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा करोडदे याला १0 हजार रुपयांची मागणी केली; परंतु खात्यात पैसे नसल्याने करोडदे याने त्याच्या मालकाला खात्यात १0 हजार रुपये टाकण्यास सांगितले होते. मालकाने खात्यात १0 हजार रुपये जमा केले. त्यानंतर एएसआय शेख अन्वर याने करोडदे याला पुन्हा ५00 रुपयांची लाच मागितली. दरम्यान, करोडदे याच्या मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने एसीबीने रेल्वे पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून लाच घेताना एएसआय शेख अन्वर याला गजाआड केले. मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल गवई, इरफान पठाण हे दोघे फरार झाले. एसीबीने या दोघाही लाचखोरांना बुधवारी गजाआड केले. गुरुवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले जाईल.