घुंगशी येथून दोन बैलजोड्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:58 IST2021-01-08T04:58:09+5:302021-01-08T04:58:09+5:30

घुंगशी येथील शेतकरी श्रीराम पुरुषोत्तम काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या लाल व पांढऱ्या रंगाच्या दोन बैलजोड्या २९ ...

Two oxen from Ghungshi to Lampas | घुंगशी येथून दोन बैलजोड्या लंपास

घुंगशी येथून दोन बैलजोड्या लंपास

घुंगशी येथील शेतकरी श्रीराम पुरुषोत्तम काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या लाल व पांढऱ्या रंगाच्या दोन बैलजोड्या २९ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. श्रीराम काटे यांनी पहाटे गोठ्यात डोकावून पाहिले असता दोन्ही बैलजोड्या दिसून आल्या नसल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता मिळून आल्या नाहीत. ६० हजार रुपये किंमत असलेल्या बैलजोड्या चोरीस गेल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने श्रीराम काटे यांनी ५ जानेवारी रोजी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय कंडारकर व हेडकॉन्स्टेबल सुभाष उघडे करीत आहेत.

Web Title: Two oxen from Ghungshi to Lampas