शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

जागतिक पर्यटन दिनावर दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतली पर्यटनाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:57 PM

दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली.

अकोला-जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनाची ओळख व्हावी,देशाटनाविषयी जनजागरण व्हावे,  पर्यटनाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अकोला,बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वात  एक दिवसीय पर्यटन जनजागरण अभियान राबविण्यात आले.पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पावस पर्यटन संस्थेच्या वतीने प्रभात किड्स, बुलडाणा येथील सहकार विद्या मंदीर येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आलेत.या दिनी दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनास चालना देण्याची गरज व्यक्त केली होती. पर्यटनातून येणारा अनुभव जीवन समृद्ध करतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन पावसचे अजय सेंगर यांनी पर्यटन प्रतिज्ञा तयार केली. या संकल्पनेस अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी प्रोत्साहन देत विविध शाळांना पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन शपथ घेण्याचे आवाहन केले होते.जिल्ह्यातील विविध शाळांच्या प्रार्थना सभेत सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे शाळेच्या अध्यक्षा सौ.कोमल झंवर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना  पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच प्रभात किड्स स्कूल येथे  पावस टुरिझमचे संचालक अजय सेंगर यांनी  विद्यार्थ्यांना  शपथ दिली. यावेळी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, प्रदीपसिंह राजपूत, मनोजसिंग बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली असून हा एक विक्रम असल्याचे मानले जात आहे.या उपक्रमाचे शैक्षणिक विश्वात सर्वत्र करण्यात येत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थीtourismपर्यटन