शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन ठार, नऊ जखमी

By admin | Updated: July 17, 2015 01:56 IST

राष्ट्रीय महामार्गावर ६ वर नायगाव फाट्यानजिक अपघात.

नांदुरा (बुलडाणा) : नांदुर्‍याकडे प्रवासी घेवून जाणार्‍या टाटा मॅजिक आणि नांदुर्‍याकडून मलकापूरकडे जाणार्‍या टाटा ४0७ या दोन वाहनांमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात टाटा मॅजिकमधील दोन प्रवाशांचा मृत्यू, तर ९ जण जखमी झाले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खामगाव येथे हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर नायगाव फाट्यानजिक गुरूवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टाटा मॅजिक क्र. एमएच २८ आर ३0८६ आणि टाटा ४0७ क्र. एमएच 0४-८७0६ या वाहनांची जोरदार धडक होवून, शेख नईम शेख अश्फाक (वय ६0, रा. वडनेर भोलजी) आणि मलनखान रहेमानखान (वय ४५ रा. नांदुरा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गुंफाबाई भिकाजी ठाकरे (वय ५0, रा. वडनेर भोलजी), डिगांबर हिवराळे (वय ५0, रा. डिघी), शांताबाई नारायण गुंजकर (वय ६0, रा. खामखेड), राजेंद्र रामभाऊ येनकर (वय ३0, रा. वडगाव डिघी) आणि सखाराम नवृत्ती वनारे (रा.धानोरा जंगम) हे पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खामगाव येथे हलविण्यात आले. इतर चार जखमींवर जखमींवर नांदुरा येथे उपचार सुरु आहेत.

*रुग्णवाहिका बंद

 नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने, १0८ क्रमांकावर उपलब्ध असलेली येथील रूग्णवाहीका सुसज्ज असणे आवश्यक असते; मात्र येथील रुग्णवाहिकेचे टायर फुटल्याने २ महिन्यापासून रुग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे अपघातातील रुग्णांना वेळेवर रुग्णसेवा न मिळाल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला.