शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाचखोर पोलिसांना अटक

By admin | Updated: May 31, 2017 01:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी बोरगाव मंजू येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी १,५00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार तो बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. आता त्याने दारूचा व्यवसाय बंद केला. त्यानंतरही बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पांडुरंग इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल हरीश शालिग्राम सातव हे तक्रारदाराला त्याच्यावर फौजदारी कारवाई न करण्यासाठी १,५00 रुपयांची मागणी करीत होते. त्यामुळे तक्रारदाराने २२ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी मनोहर इंगळे व हरीश सातव यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला; परंतु लाचखोर पोलीस कर्मचारी मनोहर इंगळे व हरीश सातव यांना संशय आल्याने, त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही; परंतु त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम ७, १५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. दोघाही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. लाचखोरांविरुद्ध नागरिकांनी पुढे यावेनागरिकांना अनेकदा शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्या जाते किंवा लाच स्वीकारली जाते. लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हा आहे; परंतु सातत्याने लाच घेण्याचे गुन्हे घडतात. देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी नागरिकांनी लाचखोरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी किंवा १0६४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी स्पष्ट केले.