तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:22 IST2017-11-20T20:13:34+5:302017-11-20T20:22:50+5:30
आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.

तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.
आझाद कॉलनीतील रहिवासी मुमताज परवीन शेख रियाज या सोमवारी घरी एकट्याच असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर परवीन यांच्या तोंडावर गुंगीचे पावडर असलेला रुमाल लावला. या प्रकारामुळे परवीन या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यामुळे चोरट्याने घरातील ५ हजार रुपयांचे दागिने व ५ ते ६ हजार रुपये रोख असा एकूण १0 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी महिलेने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे.