शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी तयार होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:13 PM

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या येत्या काही दिवसांमध्ये बदली करण्यात येणार आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या येत्या काही दिवसांमध्ये बदली करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग रजेवर गेल्या असताना, त्यांच्याकडील पदभार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनी शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बदलीपात्र शिक्षकांची माहिती संकलित करून यादी तयार करण्यासोबतच मॅपिंग करणे, पीयूसी करणे आणि अवघड क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण क्षेत्राची यादीसुद्धा तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोणते अवघड क्षेत्र आहे, याचीसुद्धा यादी निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बदलीपात्र शिक्षकांची यादी आणि अवघड क्षेत्राची यादी तयार झाल्यानंतरच बदली प्रक्रियेला वेग येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक