शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!

By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST

‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर; भाववाढ नियंत्रणासाठी तूर डाळ साठय़ावर नियंत्रण योग्य.

अकोला: तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी डाळीच्या साठा र्मयादेवर निर्बंध योग्य असले तरी, त्यामध्ये सोयाबीनसह तेलबियांच्या साठा र्मयादेवरही निर्बंध लादण्यात आल्याने, शेतकर्‍यांकडील सोयाबीन घेण्यास धजावत नाहीत. तसेच सोयाबीनचे भावदेखील कमी झाल्याने, शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे तेलबियांच्या साठय़ासाठी र्मयादेचे निर्बंध नकोच, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी उमटला. तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबिया साठेबाजीविरुद्ध धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरोधात कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यामध्ये तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठा र्मयादेचेही निर्बंध लावण्यात आले आहेत. र्मयादेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याच्या कारणामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यास व्यापार्‍यांकडून कानाडोळा करण्यात येत असून, याच कारणामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरुद्ध कारवाई करण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तुरीला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतीमालाच्या साठवणूक र्मयादेचे निर्बंध घालण्याऐवजी उत्पादन कसे वाढेल, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी मांडण्यात आला. या परिचर्चेत ललित बहाळे, मनोज खंडेलवाल, वसंत बाछुका,- मधुकरराव सरप, अरुण काळे, नरेश बियाणी,कैलास खंडेलवाल, द्वारकादास चांडक आदी मान्यवर सहभागी झाले होते.