शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

फ्लेक्स लावण्यावरून तणाव; पांढुर्णा गावात दोन गट आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:27 AM

आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्दे पोलिसांमुळे टळला अनर्थ 

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारीही गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दुपारी शांतता समितीची बैठक घेऊन हा वाद सामोपचाराने सोडविण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये रीतसर ठराव घेऊनच गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे लावायचे याचा निर्णय घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. पांढुर्णा गावातही ग्रामपंचायतच्या राजकारणावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाने रविवारी रात्री गावाच्या प्रवेशद्वारावर महापुरुषाचे फ्लेक्स लावले; मात्र दुसर्‍या गटातील युवकाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाला. या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजाचे झेंडे लावण्यात आले आहेत. आता त्याच प्रवेशद्वारावर दुसर्‍या गटाने महापुरुषाचे फ्लेक्स लावले. त्याला विरोध झाल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास आदिवासी, हटकर आणि दुसर्‍या समाजातील लोक लाठय़ा- काठय़ा आणि शस्त्रे घेऊन आमने-सामने आले. याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खारडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. समयसूचकता दाखवून ठाणेदार गजानन खारडे आणि त्यांचे पोलीस पथक गावात पोहोचल्याने दंगलसदृश निर्माण झालेली परिस्थिती निवळली. सोमवारीही या प्रकरणावरून तणावाची परिस्थिती कायम होती. पातूरचे तहसीलदार रामेश्‍वर पुरी, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पातूरचे ठाणेदार खंडेराव, ग्रामसेवक योगेश कापकर, सामाजिक कार्यकर्ते, भारिप-बमसंचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी पांढुर्णा गावात सभा घेऊन प्रकरण सामोपचाराने मिटविले. यावेळी प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे जे काही लावायचे असेल, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये रीतसर ठराव घेऊन निर्णय घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (वार्ताहर)

बाळापूरमध्ये झेंडा लावण्यावरून तणावबाळापूर : शहरात नगर परिषदेच्यावतीने लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर विविध धर्मियांनी आपापले झेंडे लावले होते. त्यामुळे सोमवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सर्वच झेंडे काढल्याने तणाव निवळला. बाळापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने विजेच्या खांब्यावर विविध ठिकाणी वेगवेगळ्य़ा धर्माचे झेंडे काही युवकांनी लावले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी बाळापूर पोलिसांच्या सहकार्याने शहरात लावलेले सर्वच झेंडे काढून टाकल्याने तणाव निवळल्या गेला. 

टॅग्स :BalapurबाळापूरAkola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा