शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:30 PM

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.

अकोला : शिक्षकांच्या मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. विनावेतन काम करणाºया शिक्षकांच्या वेठविगारी व्यवस्थेला शासन जबाबदार आहे. शिक्षकांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ महासंघ व विज्युक्टाने केलेल्या आवाहनानुसार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित तुकडीवरील शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे. त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना लागू करावी, राज्य कर्मचाºयांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. यासह प्रमुख मागण्यांना घेऊन संघटना आंदोलनात उतरली आहे. शिक्षण आणि शिक्षकांप्रती शासनाच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध म्हणून शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, जिल्हाध्यक्ष डी.एस. राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम पालकर, सचिव पंकज वाकोडे, उपाध्यक्ष अविनाश काळे, राजेंद्र तराळे, संजय देशमुख गणेश वानखडे, प्रवीण ढोणे, संतोष अहिर, संजय गोळे, भास्कर काळे, संतोष गावंडे, जयदीप कुलकर्णी, प्रफुल देशमुख, संदीप बाहेकर, विठ्ठल पवार, मो. हरीस, रमेश भड, प्रशांत मलिये, अविनाश सानप, सदानंद बानेरकर, श्रीकांत मोहोळे, महल्ले सागर, कस्तुरे, दिलीप चव्हाण यांच्यासह तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकagitationआंदोलन