शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर !

By admin | Updated: November 18, 2016 02:57 IST

१५ हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा.

वाशिम, दि. १७- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी गुरुवारपासून सामूहिक रजेवर जात असल्याने कामकाजात खोळंबा निर्माण झाला. अमरावती विभागासह राज्यातील सुमारे १५ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्य सरचिटणीस श्याम जोशी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केला.तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी निवेदने, धरणे आंदोलन करण्यात आले; मात्र शासनाने अद्याप या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. शासन एकीकडे मंडळ अधिकारी स्तरावर ह्यवर्क स्टेशनह्ण निर्माण करण्याची घोषणा करते तर दुसरीकडे तेथे अत्यावश्यक व मूलभूत सुविधा पुरविण्याचा मुद्दा अस्पष्ट ठेवत असल्याने तलाठी व मंडळ अधिकार्‍यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रामीण भागात ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्ण व्यवस्थित नसल्याने, शेतकर्‍यांसह तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अनेक तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना अद्यापपर्यंंत पिंट्रर्स व लॅपटॉप पुरविण्यात आले नाहीत. साजाची पुनर्रचना प्रलंबित आहे. यासह अन्य मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. २0१६ या वर्षात नव्याने तलाठी म्हणून नियुक्त झालेले कर्मचारी या संपात सहभागी नाहीत. उर्वरित सर्व तलाठी व मंडळ अधिकारी ह्यसामूहिक रजाह्ण आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा राज्य सरचिटणीस जोशी यांनी केला. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या व रब्बी हंगामाच्या काळात तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने कामकाजाचा खोळंबा होत आहे. गावपातळीवर शेतकर्‍यांसह सर्वांंनाच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.