शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:13 AM

गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता.

अकोला : राज्यात गत दोन ते तीन वर्षांत स्वाइन फ्लूची प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर २०१८ मध्ये स्वाइन फ्लूच्या दोन हजार ५९४ रुग्णांपैकी ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गत दोन वर्षांत लोकांमध्ये केलेली जनजागृती आणि लसीकरण मोहिमेतून सामूहिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाल्याने स्वाइन फ्लूचे प्रमाण घटल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.मागील काही वर्षांपासून राज्यभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या हजारोंवर पोहोचली आहे. दोन वर्षांपासून यातील मृतांचे प्रमाणही लक्षणीय होतं; मात्र मागील पाच वर्षांत स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभरात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाºया रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. आरोग्य विभागामार्फत लसीकरण आणि लोकांमध्ये निर्माण झालेली सामूहिक प्रतिकारकशक्ती यामुळे स्वाइन फ्लूचे प्रमाण घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०१८ मध्ये पावसाळा आणि हिवाळ््यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची लक्षणीय संख्या होती; मात्र दरम्यानच्या काळात करण्यात आलेली जनजागृती तसेच लोकांमध्ये वाढलेल्या प्रतिकारकशक्तीमुळे मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.पाच वर्षातील स्वाइन फ्लूची स्थितीवर्ष             रुग्ण                 मृत्यू२०१५          ८५८३              ९०५२०१६         ८२                २६२०१७      ६१४४                ७७८२०१८        २५९४              ४६२२०१९         २२७१          २४०स्वाइन फ्लूची लक्षणेतापघसा खवखवणेअंगदुखीथकवाअतिसार, उलटीअचानक तोल जाणेश्वसनाचा त्रासमुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणेअशी करा प्रतिबंधात्मक उपाय योजनासार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करामास्कचा वापर करावाहात वारंवार साबणाने धुवाभरपूर पाणी प्यासंतुलित आहार घ्यास्वाइन फ्लूच्या लढ्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती व लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनी रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी संतुलीत आहार व नियमित व्यायाम केल्यास ही स्थिती आणखी सुधारेल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूAkolaअकोला