शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

‘फ्लायओव्हर’च्या आड येणाऱ्या वृक्षांचे होणार सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:22 PM

ही झाडे बांधकामामध्ये अडथळा ठरणार असल्यामुळे ही कशी हटवावी, याबाबत मंगळवारी महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंथन करण्यात आले

अकोला: शहरात ‘फ्लायओव्हर’च्या बांधकामास सुरुवात झाली आहे. अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन, नेहरू पार्क चौक ते रेल्वे स्टेशन आणि सातव चौक ते न्यू तापडिया नगरदरम्यान होणाºया फ्लायओव्हर पुलाच्या आड शेकडो झाडे येत आहेत. ही झाडे बांधकामामध्ये अडथळा ठरणार असल्यामुळे ही कशी हटवावी, याबाबत मंगळवारी महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंथन करण्यात आले. बैठकीमध्ये फ्लायओव्हर पुलाच्या आड येणाºया वृक्षांचे सर्वेक्षण करून वृक्षतोड करावी आणि त्या बदल्यात वृक्षारोपण करण्याची सूचना वृक्षप्रेमींनी केली.स्थायी समिती सभागृहात वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. सभेला महापौर विजय अग्रवाल, मनपा वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त प्रमोद कापडे, शहर अभियंता सुरेश हुंगे, नगरसेवक विशाल इंगळे, तुषार भिरड, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, प्रशांत राजुरकर, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, वृक्षप्रेमी देवेंद्र तेलकर, उदय वझे, विधी अधिकारी श्याम ठाकूर, जलप्रदायचे एच. जी. ताठे, विद्युत विभागाचे रवींद्र वाकोडे, महावितरणचे मनोज नितनवारे उपस्थित होते. सभेमध्ये उड्डाणपूल बांधकाम प्रस्तावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार चर्चा करून निर्णय घेणे, क्षेत्रीय अधिकारी पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण झोन अंतर्गत मनपा अंतर्गत करण्यात येणाºया विकास कामांच्या प्रस्तावानुसार जसे (सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, महाबँक, मा. सदस्य मनपा अकोला) यांच्याकडून वृक्ष कपातीबाबत प्राप्त पत्र, प्रस्तावानुसार तसेच शहरातील नागरिकांकडून वृक्षतोडीबाबत प्राप्त तक्रारीवर चर्चा करून निर्णय घेणे, अकोला महानगरपालिकेत वृक्ष (उद्यान विभाग) स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान ३४८ वृक्षांचे सर्वेक्षण करून पुलाला अडथळा निर्माण करणारेच वृक्ष तोडावे, अशी सूचना निसर्ग अभ्यासक उदय वझे, देवेंद्र तेलकर यांनी मांडली. वृक्ष लागवडीवरदेखील जोर देण्यात आला. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी ज्यांना वृक्ष तोडण्याची परवानगी दिली, त्यांना आॅक्सिजन देणारे व पाच वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असणारी पाच झाडे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले, तरच त्यांना परवानगी द्यावी, असे म्हटले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका