शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अचानक सरकीचे दर कोसळले, रुईचे उत्पादन वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:05 IST

अकोला: सरकीचे दर अचानक कोसळले असून, त्याचा परिणाम कापूस दरावर झाला आहे. मागील महिन्यात सरकीचे दर हे प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपयांवर गेले होते ते आजमितीस ५०० रुपयाने घटले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सरकीचे दर अचानक कोसळले असून, त्याचा परिणाम कापूस दरावर झाला आहे. मागील महिन्यात सरकीचे दर हे प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपयांवर गेले होते ते आजमितीस ५०० रुपयाने घटले आहेत. रुईचे उत्पादन मात्र बऱ्यापैकी झाले आहे.सरकीचे उत्पादन हे कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असते. मागील वर्षीच्या खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन हे ३५१ लाख गाठी एवढे झाले आहे. रुईची उत्पादन मात्र ५६८ किलो प्रतिहेक्टर आहे. महाराष्ट्रात हेच उत्पादन ८९ लाख गाठी एवढे झाले आहे. महाराष्ट्रातील कापसापासून निघणाऱ्या रुईची उत्पादकता हेक्टरी ३९८ किलो आहे. विदर्भातील १४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर २८ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. रुईची उत्पादकता प्रतिहेक्टर ३२८ किलोग्रॅम आहे. रुईचे उत्पादन वाढल्याने सरकीचेही उत्पादन वाढले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम सरकीच्या दरावर झाल्याचे वृत्त आहे; पण सरकीचा वापर काही प्रमाणात खाद्य तेलातही केला जातो आणि पशुखाद्यही तयार केले जाते. असे असताना सरकीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागील महिन्यात कापसाला मिळणारे समाधानकारक दर कमी झाल्यानंतर आता सरकीचे दर कोसळले आहेत. सरकीचे दर बाजारात कोसळले आहेत. त्याचा एकूण कापूस दरावरही परिणाम होत आहे. मागील महिन्यात २,६०० रुपये प्रतिक्विंटल सरकी होती ती आजमितीस २,१०० रुपयांवर येऊन ठेपली आहे.-बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.