शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विद्यार्थ्यांची होणार गुणवत्ता चाचणी

By admin | Updated: July 15, 2015 23:50 IST

भाषा आणि गणिताचे होणार मूल्यमापन

प्रवीण खेत/अकोला : वाचन, लेखन आणि गणन या मूलभूत अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे तसेच दज्रेदार शिक्षण देण्यात येत आहे. परंतु, असे असतानाही अध्ययन संपादनामध्ये राज्यातील शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांंची अध्ययन संपादन पातळी तपासण्यासाठी राज्य स्तरावर अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आरोग्य तपासण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) नवी दिल्लीमार्फत २00१ पासून इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवी आदी वर्गांंचे टप्प्याटप्प्याने अध्ययन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व जिलंच्या अध्ययन संपादन पातळीचा स्तर तपासण्यात येणार असून, भाषा व गणित या विषयावर भर देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांंचे संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करणार आहे, तर इयत्ता ९ वी ते १0 वीचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ करणार आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती व र्मयादा विचारात घेऊन कृती कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित संस्थांना सर्वेक्षण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.