शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद; मनपाचा कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:11 IST

एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडण्यासोबतच महावितरण कंपनीच्यावतीने मनपाच्या पथदिव्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणारी अतिरिक्त विद्युत तार उपलब्ध नसल्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरू राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.शहरातील बहुतांश भागात रात्रंदिवस पथदिवे सुरू राहत असल्याचा आर्थिक भुर्दंड अकोलेकरांवर पडत असून, महावितरणच्यावतीने विजेचा अतिरिक्त अधिभार त्या-त्या प्रभागातील नागरिकांवर आकारला जात असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असतानाच सत्ताधारी भाजपही झोपेत असल्याचे दिसून येत आहे.शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. पथदिवे देखभाल दुरुस्तीच्या बदल्यात झोननिहाय सुमारे तीन-साडेतीन लाख रुपये अदा केले जातात. अर्थात, पथदिव्यांवर महिन्याकाठी १२ लाख रुपये खर्च होत असले, तरी शहरातील मुख्य मार्गांवर अद्यापही नादुरुस्त पथदिव्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे.शहरातील बंद पथदिव्यांच्या संदर्भात मनपाच्या विद्युत विभागाने सविस्तर माहिती ठेवणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे फावत असून, नादुरुस्त पथदिव्यांची १५-१५ दिवसांतही दुरुस्ती केली जात नसल्याची परिस्थिती आहे.‘टायमर’ बिघडले; विजेची उधळपट्टीमहापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहरात ‘एलईडी’च्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे पथदिव्यांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. काही भागात पथदिवे चोवीस तास सुरू राहतात. त्यावर होणारी विजेची अनावश्यक उधळपट्टी टाळण्यासाठी सत्ताधारी व प्रशासन उपाययोजना करतील का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

हा भुर्दंड अकोलेकरांच्या मस्तकी!महावितरण कंपनीने विद्युत तार उपलब्ध करून दिल्यास त्यावर मनपाला टायमर लावता येते. प्रभागातील कोणत्या भागात विजेचा किती वापर झाला, याची महावितरणकडे नोंद राहते.‘टायमर’अभावी पथदिवे दिवसा सुरू राहत असल्याने वीज देयक वाटप करताना त्या-त्या परिसरातील वीज ग्राहकांवर अतिरिक्त अधिभार लादून त्या बदल्यात वीज देयकाचे पैसे वसूल केल्या जात असल्याची माहिती आहे.अर्थात, मनपाच्या भोंगळ कारभारामुळे हा आर्थिक भुर्दंड अकोलेकरांना सहन करावा लागत आहे. यावर महापौर विजय अग्रवाल ठोस तोडगा काढतील का, असा सवाल सर्वसामान्य अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका