शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बसस्थानकात साचले पाणी; प्रवासी त्रस्त

By admin | Updated: November 16, 2014 00:57 IST

एसटी प्रशासनाचे होत आहे समस्येकडे दुर्लक्ष.

अकोला: शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे बसस्थानक परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळी जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाचे पाणी बसस्थानक परिसरात साचले. खामगाव, औरंगाबाद या शहरांकडे जाणार्‍या बस याच परिसरात थांबतात. दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. बस थांबण्याच्या ठिकाणीच पाणी साचले असल्याने बसमधून उतरताना व चढताना प्रवाशांना त्रास होत होता. सकाळी पाची साचले असल्याचे निदर्शनास आल्यावरही एस.टी. प्रशासनाच्यावतीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर दुपारी तीन वाजेपर्यंत बसस्थानकात पाणी साचलेले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी या प्रकरणाची तक्रारही केली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. एस.टी. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचणारच नाही, याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली.