शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:13 IST

अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे

ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.४९ टक्के, एकबुर्जी ७२.१० तर सोनल धरणात ९३.७९ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ ३६.२३ टक्केच जलसाठा आहे.

अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तर आजच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, ३ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा ११.६६, तर उतावळी धरणातील पातळी ३७.७० टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १४.६७ टक्के, पेनटाकळी धरणात १०.६२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७.९५ टक्के, पलढगमध्ये २७.८३ टक्के, मन धरणात २२.२७ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.४९ टक्के, एकबुर्जी ७२.१० तर सोनल धरणात ९३.७९ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ ३६.२३ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९१.९२, अरुणावती ६५.३९ तर बेंबळा धरणात ३९.९२ टक्केच जलसाठा आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७३.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९३.३१ टक्के जलसाठा असून, उमा ९०.७५, मोर्णा धरणात ४८.८२ टक्के, तर वान धरणात ८८.६५ टक्के जलसाठा आहे.

काही धरणात अल्प जलसाठा असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. ज्या धरणांत भरपूर जलसाठा आहे, तेथे काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. यात अकोला जिल्ह्यातील तीन धरणांचा समावेश आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणbuldhanaबुलडाणाwashimवाशिम