शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी-दरवाढ केल्यास कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:18 IST

संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.

अकोला : जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा असून, गरजेनुसार जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना माल वाहतूक व उपलब्धतेसंदर्भात येणाºया अडचणी सोडविण्याठी जिल्हा प्रशासन मदत करणार आहे. तथापि, जीवनावश्यक वस्तूंची कोणत्याही प्रकारची साठेबाजी व दरवाढ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ कालावधीत जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, मागणी व पुरवठ्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह किराणा विक्रेता संघटना, धान्य व्यापारी असोसिएशन, दालमिल असोसिएशन, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, गॅस एजन्सीचे चालक उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करता येत नाही किंवा उपलब्धता नाही म्हणून टंचाई निर्माण होत असेल आणि त्याचा फायदा घेऊन वस्तूंची दरवाढ व साठेबाजी करण्यात येत असेल तर प्रशासन असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिला.

वस्तू उपलब्धतेचा घेतला आढावा!जिल्ह्यात गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, मसाले, डाळी इत्यादी अन्नधान्यासह भाजीपाला, कांदे, बटाटे, बिस्कीट आदी जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी घेतला.

औषधी उपलब्धतेची घेतली माहिती!जिल्ह्यातील औषधांच्या दुकानांमध्ये आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. तसेच मास्क, सॅनिटायझर उपलब्धतेचा आढावादेखील जिल्हाधिकाºयांनी घेतला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारी