शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

 राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा :अकोल्याच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:08 AM

विजयी बॉक्सरांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळणार आहे.

अकोला: १९ व्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्य फेरीतील लढती शनिवारी झाल्या. यामध्ये अकोला शहराच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल झाल्या. ४८ किलो वजनगटात दिया बचे, ५१ किलो संगीता रुमाले, ६० किलो पूनम कैथवास, ८१ किलोच्यावर वजनगटात शायान पठाण हिने शानदार खेळप्रदर्शन करीत अंतिम लढतीसाठी पात्रता सिद्ध केली.४८ किलो वजनगटात ठाण्याची नीलम यादव आणि अकोला शहरची दिया बचे यांच्यात लढत झाली. यामध्ये ०-५ गुणांनी दियाने विजय मिळविला. ५१ किलो वजनगटातील लढत मुंबई शहरची ज्योती धाडसे आणि अकोला शहरची संगीता रुमाले यांच्यात लढत झाली. यामध्ये संगीताने विजयी ठोसे मारले. ६० किलो वजनगटात अकोल्याची पूनम कैथवास आणि साताराची पूजा शिंदे यांच्यात लढत झाली. पूनमने पहिल्याच फेरीत आक्रमक शैली वापरू न पूजाला धूळ चारली. पूजाने खेळण्यास नकार दिल्यामुळे पंचांनी लढत थांबविली. पूनमला विजयी घोषित करण्यात आले. ८१ किलोच्यावर वजनगटातील लढत अकोल्याची शायान पठाण आणि पुणेची खानसा शेख यांच्यात झाली. दोघींनीही उत्तम खेळप्रदर्शन केले. यामध्ये अकोल्याच्या शायानने बाजी मारली.उर्वरित लढतींमध्ये रेखा येलगुंडे पुणे, अंजली गुप्ता, तेजस्विनी जव्हेरी औरंगाबाद, ऐश्वर्या वाघ अहमदनगर, नेहा मराठे पालघर, लक्ष्मी मेहरा पुणे, प्रियंका गवळी कोल्हापूर, सिमरन मेनन मुंबई, वैष्णवी मांडेकर पुणे, अंजली मोरे नाशिक, मनीषा ओझा मुंबई, सानिका ससाने कोल्हापूर, ऋतुजा दिवेकर मुंबई यांनी विजय मिळविला. उद्या रविवारी अंतिम लढतीमध्ये कोण बाजी मारते, याकडे बॉक्सिंगप्रेमींचे लक्ष लागले आहे. विजयी बॉक्सरांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळणार आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंग