शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू करा!

By admin | Updated: June 15, 2015 01:55 IST

गोपीकिशन बाजोरिया यांची नितीन गडकरींकडे मागणी.

अकोला- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासोबतच खामगाव-जालना मार्ग आणि इतर रस्ते विकासांची कामे लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शनिवारी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना आ. बाजोरिया यांनी त्यांच्याकडे अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबतचे निवेदन सोपवून त्यांना ही कामे लवकर सुरू करण्याची विनंती केली. यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणासोबत खामगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर मार्गासाठीही निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली. त्यावर गडकरी यांनी चौपदरीकरण कामाचे सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगून हे काम पूर्ण होताच चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. याशिवाय गडकरी यांनी खामगाव-जालना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणार असल्याचेही जाहीर केले. हे निवेदन सोपविताना आ. बाजोरिया यांच्यासोबत निकेश गुप्ता आणि चिखलीचे नगरसेवक नीलेश अंजनकर उपस्थित होते.