शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे निकृष्ट

By admin | Updated: July 26, 2014 21:01 IST

अनेक ठिकाणी बीजे अंकुरली नाही

बाभुळगाव जहागीर: गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होत असून, यंदा पेरण्यात आलेले सोयाबीन बियाणे पूर्णपणे उगवलेच नसल्याचे बाभुळगाव जहागीरसह परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी सांगितले आहे. अकोला तालुक्यात शेतजमिनीचे क्षेत्र तब्बल ९६ हजार हेक्टर आहे. त्यावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. पावसाला बराच विलंब झाल्याने मूग, उडीद, ज्वारी, तूर, आदी पिक ांची वेळ निघून गेली. शेतकर्‍यांसमोर सोयाबीन किंवा कपाशीची पेरणी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. गेल्या आठवड्यात बर्‍यापैकी पाऊस पडल्याने बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु ५ ते ६ दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बीजे पूर्णपणे अंकुरलीच नाही. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. तब्बल अडीच हजार रुपये प्रती बॅग अशा दराने खरेदी केलेले हे बियाणे उगवलेच नसल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. आता या सर्व शेतक र्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते, हे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांचा दर्जा खालावला असून, शेतकर्‍यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असा सल्ला कृ षी विभागाकडून देण्यात आला होता. तो खरा ठरल्याचे दिसत आहे.