शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मागणीपेक्षा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

अमरावती विभागात ५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध

संतोष येलकर / अकोला
या वर्षीच्या खरीप हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १६ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीसाठी १२ लाख क्विंटल बियाण्याची मागणी आहे; मात्र मागणीच्या तुलनेत आतापर्यंत विभागात केवळ ५ लाख १0 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मागणीपेक्षा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे.
लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर, या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली असून, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांची खरेदी सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर अमरावती विभागात १६ हेक्टरवर सोयाबीन पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी १२ लाख क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाकडून महाबीजसह विविध कंपन्यांकडे करण्यात आली आहे. मात्र अतवृष्टी आणि गारपिटीमुळे कापणी हंगामात सोयाबीनचे पुरेसे बियाणे तयार करता आले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत आहे. परिणामी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची एकूण मागणी १२ लाख क्विंटल असली तरी, प्रत्यक्षात आतापर्यंत (६ जून) केवळ ५ लाख १0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. मागणीच्या तुलनेत सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर, यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.