शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साठा निर्बंधातून सोयाबीन वगळले!

By admin | Updated: November 18, 2016 03:09 IST

जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा शासनाचा आदेश.

संतोष येलकरअकोला, दि. १७- अकोला जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवणुकीसाठी र्मयादा राहणार नाही.शासनाच्या गत २९ सप्टेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि ३0 सप्टेंबर रोजीच्या पत्राप्रमाणे डाळी, खाद्य तेल व खाद्य तेलबिया या जीवनाश्यक वस्तूंवरील साठा निर्बंधास ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु सद्यस्थितीत राज्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन जास्त प्रमाणात झाल्याने, बाजारात सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. बाजारात सोयाबीनचे दर घसरल्याने मिळेल त्या भावात कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. या पृष्ठभूमीवर सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी ५ नोव्हेंबरपासून सोयाबीनला साठा निर्बंधातून वगळण्यात येत असल्याचा आदेश गत ८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांसह संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. सोयाबीन साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीनची साठवणूक करण्यास र्मयादेचे बंधन राहणार नाही. घाऊक व्यापारासाठी परवान्याची नाही गरज!साठा निर्बंधातून सोयाबीनला वगळण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र घाऊक व्यापार परवाना आदेश, २0१५ च्या नियम ३ नुसार, सोयाबीनच्या घाऊक व्यापारासाठी परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.जीवनाश्यक वस्तू अधिनियमांतर्गत लागू असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात आले असून, यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचा आदेश प्राप्त झाला आहे. साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीन साठवणुकीला र्मयादा राहणार नाही.-अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.