सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार
By सचिन राऊत | Updated: February 16, 2024 22:12 IST2024-02-16T22:11:20+5:302024-02-16T22:12:41+5:30
या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी आराेपी गाेपाल मारूती वारकरी याच्याविरुध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.

सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार
अकाेला : सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रहीवासी असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सैनीकाने चाकूचा धाक दाखवून लैंगीक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी आराेपी गाेपाल मारूती वारकरी याच्याविरुध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.
सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी असलेली १५ वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असतांना आराेपी गोपाल मारुती वारकरी वय ३० वर्ष (नोकरी 105 इंजिनियर रेजिमेंट, इंडियन आर्मी) रा. चाचोंडी रोड, हनुमान नगर, मोठी उमरी याने तीला जबरदस्तीने उचलून नेत एका निर्जन स्थळी तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकीही दिली.
घडलेला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगीतला असता त्यांनी तातडीने सिव्हील लाइन्स पाेलिस स्टेशन गाठत या प्रकरणाची तक्रार दिली. पाेलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आराेपी गाेपाल वारकरी याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम -३७६,३५४, ४५२, व पास्काे कायद्याच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हील लाइन्स पाेलिस करीत आहेत.