शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खांद्याला खांदा लावून लढणारेच आता एकमेकांच्या विरोधात!

By admin | Updated: September 28, 2014 01:00 IST

अकोला जिल्ह्यातील दिग्गजांची परीक्षा : मतविभाजन टाळण्यासाठी लागणार कस

अकोला- तीन महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणार्‍या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे यावेळी दिग्गजांच्या लढती अनुभवयास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांची महायुती होती. काँग्रेस आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या कटू अनुभवांमुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याबाबत चाचपणी सुरू केली होती. त्यातूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून झालेल्या मतभेदामुळे युती आणि आघाडीचे राजकारण संपुष्टात आले. आघाडी आणि युती फुटल्यामुळे लोकसभेत खांद्याला खांदा लावून लढणार्‍या नेत्यांनाच या पक्षांनी उमेदवारी दिली. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि भाजपचे माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा खांद्याला खांदा लावून आले होते. शनिवारी गोवर्धन शर्मा आणि गुलाबराव गावंडे यांनी अकोला पश्‍चिममधून एकमेकांच्या विरोधात नामनिर्देशनपत्र दाखल केले. हीच परिस्थिती अकोला पूर्व मतदारसंघातही होती. काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यासाठी अर्ज भरताना सहकार गटातील नेते एकत्र आले होते. यावेळी सहकार गटातीलच शिरिष धोत्रे आणि डॉ. सुभाष कोरपे यांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज भरले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणधिर सावरकर आणि शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आकोटमध्ये महेश गणगणे यांनी काँग्रेसकडून तर राजीव बोचे यांनी राकाँकडून नामनिर्देशपत्र दाखल केले. आ. संजय गावंडे यांना शिवसेनेने पुन्हा रिंगणात उतरविले, तर भाजपने प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी दिली. बाळापूरमध्ये काँग्रेसचे नातिकोद्दिन खतीब यांच्याविरोधात राकाँने अल्पसंख्याक समाजातील पातूरचे शहर अध्यक्ष हिदायत खाँ रुनका यांना उमेदवारी दिली. येथे काँग्रेसचे नेते नारायण गव्हाणकर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. जिल्ह्यातील दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने, मतविभाजन टाळण्यासाठी दिग्गजांचा कस लागणार आहे. गुरू शिष्य रिंगणातविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अकोला पश्‍चिम मतदारसंघातून गुरु आणि शिष्य एकमेकांच्या विरोधात उभे झाले आहेत. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कधीकाळी गावंडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणारे विजय देशमुख यांना काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.***दार, जिल्हाध्यक्षांची परीक्षाखासदार संजय धोत्रे यांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना तिकिट मिळावे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता युती फुटल्यामुळे त्यांना मतांचे विभाजन टाळून उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागेल. सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कसोटीही या निवडणुकीत लागणार आहे.