शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’वरील औषधांचा तुटवडा

By admin | Updated: February 19, 2015 02:12 IST

खासगी औषध विक्रेत्यांकडेही औषधी नसल्याचे पुणे सहसंचालकांचे पत्र.

सचिन राऊत/ अकोला:  स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव ८ ते ९ जिल्हय़ांमध्ये झाला असून, या आजाराने आतापर्यंत ५६ जणांचा बळी घेतला; मात्र अशा भीषण परिस्थितीतही राज्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी औषधी विक्रेत्यांकडे स्वाइन फ्लूवरील औषधांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य सहसंचालकांनी स्वाइन फ्लूवरील प्रतिबंधात्मक औषधींचा साठा करण्याचे आदेश ९ फेब्रुवारी रोजीच दिले होते, हे विशेष. राज्यातील खासगी औषधी विक्रेत्यांकडेही ह्यस्वाईन फ्लूह्णवरील प्रतिबंधात्मक औषधी पाहीजे त्या प्रमाणात उपलब्ध नसून, अशी औषधी दुकाने शोधून त्याची यादी आरोग्य विभागाकडे तयार ठेवावी, असे सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.राज्यात ८ ते ९ जिल्हय़ांमध्ये ह्यस्वाइन फ्लूह्णची लागण झाली असून, सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरनंतर पुणे, अमरावती, सोलापूर, नाशिक, लातूर, चंद्रपूर, वाशिम आणि अकोल्यात आढळून आले आहेत. अवघ्या १0 ते १५ दिवसांच्या कालावधीत स्वाइन फ्लूने राज्यात ५६ जणांचा बळी घेतला असून, योग्य उपचार तातडीने न मिळाल्याने त्यांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांना अत्यावश्यक सेवेसह प्रतिबंधात्मक औषधी तातडीने उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य सहसंचालकांनी ९ फेब्रुवारी रोजी आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठविले. खासगी औषधी विक्रेत्यांकडे ही औषधी उपलब्ध असल्यास त्यांची एक यादी तयार करण्याचे आदेश सहसंचालकांनी त्या पत्राद्वारे दिले होते. ही यादी जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते; मात्र त्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य उपसंचालक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी स्वाइन फ्लूवरील औषधींच्या उपलब्धतेबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाही.