शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हा-यात पाच लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: January 19, 2015 02:38 IST

दोघे अटकेत; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.

तेल्हारा (अकोला): अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तेल्हारा शहरात गुटख्याचा पुरवठा करणार्‍या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख १0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या घटनेनंतर पथकाने बोलेरो वाहन जप्त करून गुटख्याची अवैध वाहतूक करणार्‍या दोघांना अटक करून तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई रविवार, १८ जानेवारी रोजी पहाटे करण्यात आली. संपूर्ण राज्यात बंदी असतानाही तेल्हारा शहर व तालुक्यात राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. वाकडे हे विशेष पोलीस पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के. जाधव व त्यांचे तीन सहकार्‍यांसह शनिवारी रात्री तेल्हारा शहरात दाखल झाले. माळेगाव बाजार येथील कल्लू ऊर्फ कलीम खाँ शब्बीर खाँ (२८) व तेल्हारा येथील मोहम्मद हनिफ अ. रहेमान (४८) हे एम. एच. ३0 ए. पी. २७९५ क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून गुटख्याची वाहतूक करीत असताना या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विमल गुटख्याचे ३४00 पाकीट व विमल मसाला ३४00 पाकीट, असा एकूण ५ लाख १0 हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. तसेच दोन लाख रुपये किमतीची बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तेल्हारा पोलिसांकडे दिले. तेल्हारा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार शे. अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र करणकार, ए.एस.आय. गणेश पाचपोर, कॉन्स्टेबल विनोद गोलाईत करीत आहेत.