अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:07 IST2020-08-31T20:07:21+5:302020-08-31T20:07:35+5:30

हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

Sero survey in Akola district from September 7 | अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे!

अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे!

अकोला : जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसगार्ची स्थिती जाणून घेण्यासाठी सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार पासून होणार असून, हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, मनपा आयुक्त संजय कापडणीस, डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. उमेश कवळकर, डॉ. नेताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली, त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही, यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. असे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सोमवार, ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.


लाखामागे १०० जणांचे नमुणे घेणार!
त्यासाठी एक लाखामागे १०० व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. शहरी भागातून १४०० रक्त नमूने तर ग्रामीण भागातून १४०० असे एकूण २८०० रक्त नमूने घेण्यात येणार आहे. चाचण्या करण्यासाठी ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी, ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title: Sero survey in Akola district from September 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.